पाथरुडकडून तेलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा पिकअप वाहनाने एका स्कूटीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास फजलु पटेल यांच्या शेताजवळ घडला.
रमजान अहमद आत्तार (रा. पाथरुड) हे त्यांच्या स्कूटीवरून (MH44AJ0476) जात असताना, मागून अत्यंत वेगात आलेल्या पिकअपने (MH21BH7494) त्यांना उडवले. या अपघातात रमजान यांच्या डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर मार लागला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयताचा भाऊ आलिम अहमद आत्तार यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पिकअप चालक दिगंबर शेषेराव चांगुलपाय (रा. गोलापांगरी, जि. जालना) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!