माजलगाव शहरातून जाणाऱ्या बायपास रोडवरील न्यू महाराष्ट्र ऑटो बॅटरी या गॅरेजमधून तीन चोरट्यांनी ५३ हजार ७३८ रुपयांच्या नव्या व जुन्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही चोरी घडली असून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लड्डा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या या दुकानाचे चालक राहुल आसाराम काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय जाधव, रोहण सातपुते आणि अजय भागवत चव्हाण या तिघांनी संगनमत करून गॅरेजमधून साहित्याची चोरी केली. आरोपींनी अमॅरॉन कंपनीच्या सुमारे वीस हजार रुपयांच्या ट्रॅक्टरच्या दोन नवीन बॅटऱ्या, दुचाकीच्या तीन नवीन बॅटऱ्या आणि भंगारातील ट्रॅक्टरच्या जुन्या दहा बॅटऱ्या असा एकूण ५३ हजार ७३८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. राहुल काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीनही संशयित आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार नांगरे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!