किल्ले धारूर - धारूर शहरापासून अतिशय कमी अंतरावर भायजळी रोड वरती घाटामध्ये काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे धारूर येथील नागरिकांमध्ये पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काल सायंकाळी 7 वाजता धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या जहागीर मोहा भायजळी रोडवर काही नागरिकांना बिबट्या दिसला. या बिबट्यामुळे शहरातील नागरिक घाबरले आहेत. गेल्या काही दिवसापासून धारूर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन घडत आहे बिबट्याने घागरवाडा,आरणवाडी, जागीरमोहा भागांमध्ये काही प्रमाणात प्राण्यांचा फाडसा पाडला आहे. धारूर शहरातील अनेक नागरिक सकाळी फिरावयास जातात काही नागरिकांना अनेक वेळा बिबट्या दिसला आहे वनविभाग मात्र अजूनही झोपेत असून वन विभागाने याबाबत कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही वनविभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी परिसरात मागच्या काही दिवसांमध्ये एका शेतकर्‍याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता या घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता आता धारूर तालुक्यातही बिबट्याचा वावर झाल्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

वनविभाग झोपेत - धारूर तालुक्यात आढळणार्‍या बिबट्याच्या दर्शना बाबत वनविभाग मात्र झोपतच आहे. अनेक घटना घडून देखील वनविभागाने बिबट्याबाबत उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत धारूरचा वनविभाग झोपेतच असल्याचे दिसून येत आहे. धारूरच्या वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी तसेच नागरिक करत आहेत. दारूचा वनविभाग एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहतो की काय असेच वाटत आहे.