केज :- केज शहरात टिपू सुलतान जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनी क्षमतेच्या उल्लंघन करणाऱ्या दोन डीजेसह जयंती उत्सव समितीच्या दोन संयोजका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरात दि. २० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जुना मोंढा आणि इस्लामपुरा येथील मिरवणुकीत सहभागी असलेले अनुक्रमे सरगम बँजो आणि महाराज ७७+ आणि यांनी ध्वनी क्षमतेची तपासणी केली असता त्यांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शास आले. 

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशा वरून पोलिस कॉन्स्टेबल भारत गोरे यांच्या फिर्यादी वरून इस्लामपुरा जयंतीचे संयोजक अकबर उस्मान सय्यद आणि सरगम बॅन्जोचे चालक मालक तसेच जुना मोंढा येथील संयोजक अस्लमोद्दीन मोईजोद्दीन इनामदार आणि महाराजा ७७+ चे चालक मालक यांच्या विरुद्ध गु र नं ७२५/२०२६ गु र नं २२३ यासह ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियम २००० अन्वये कलम ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने हे तपास करीत आहेत.