माजलगाव येथील हॉटेल आरंभ परिसरात घडलेल्या हाणामारी प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून दुसऱ्या गटातील व्यापारी अंकुश सूर्यभान शिंदे यांच्यावर चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याचे समोर आले आहे. पंधरा ऑक्टोबरच्या रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली असून यात शिंदे यांची डाव्या बाजूची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे.
अंकुश शिंदे यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत प्रभाकर होके याने लोखंडी रॉडने तर सोनू उर्फ नागुराव केदारनाथ दराडे याने चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!