परळी वैजनाथ बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण भरदिवसा अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सिरसाळा येथील आशा सुपरवायझर सुनिता सतीश राऊत या ५ ऑक्टोबर रोजी दुपारी परळी ते पाथरी बसमध्ये चढत होत्या. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत पाठीमागून आलेल्या अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील १२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जोराने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड तपास करत आहेत.