परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून मळणी केलेले सुमारे ५३ हजार ९०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दोघांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बलभीम पंढरीनाथ रेपे (वय ७४, रा. परळी) यांच्या शेतातून १९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली. आरोपी सुभाष पांडुरंग शिंदे आणि बालाजी सुभाष शिंदे (दोघे रा. ईटाली, ता. जिंतूर) यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतातील ७० किलो वजनाचे ११ निळे पोते म्हणजेच एकूण ७७० किलो सोयाबीन चोरून नेले. याप्रकरणी रेपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ नोव्हेंबर रोजी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार तोवाड या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.