माजलगाव तालुक्यातील राजेगाव आणि सोन्नाथडी शिवारातून दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ५४ हजार रुपयांच्या सौर कृषी पंपांच्या मोटारी (पाणबुडी) चोरीला गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत.
पहिल्या घटनेत राजेगाव येथील शेतकरी नरहरी सखाराम कचरे यांच्या शेतातून २९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरच्या रात्री ३ एचपी क्षमतेची सौर ऊर्जेवर चालणारी २२,९७१ रुपये किमतीची मोटार चोरीला गेली. दुसऱ्या घटनेत सोन्नाथडी शिवारात बळीराम नामदेव पवार आणि त्यांचे शेजारी रामेश्वर कर्डिले यांच्या शेतातून ५ ते ६ ऑक्टोबरच्या दरम्यान ५ एचपी आणि ३ एचपी क्षमतेच्या दोन सौर मोटारी चोरीला गेल्या. या दोन्ही मोटारींची किंमत अनुक्रमे ३२,०३५ आणि २१,९८२ रुपये होती. माजलगाव ग्रामीण पोलिसांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!