माजलगाव ते गढी जाणाऱ्या रोडवर दोन दुचाकींच्या धडकेत ४२ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही दुर्घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असून, निष्काळजी दुचाकी चालकाविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनिवास सुभाषराव टिळे (वय ४२, रा. तालखेड) हे त्यांच्या दुचाकीवरून (MH 44 2758) जात होते. त्यावेळी पाठीमागून अत्यंत वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीच्या (क्र. 23 UCH 5042) चालकाने हयगयीने गाडी चालवत श्रीनिवास यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात श्रीनिवास यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मयताचे मेहुणे गणेश जोशी (रा. राजुरी) यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जायभाये पुढील तपास करत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!