माजलगाव शहरातील बायपास रोडवर असलेल्या एका ढाब्यासमोर जेवण न करताच का निघालास या कारणावरून तरुणाच्या डोळ्यावर लोखंडी वस्तूने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

शाम फुलचंद भुजगे (वय ३२) हे आरोपींसोबत असताना तुषार सोपानराव राऊत आणि त्याच्या मित्रांनी 'तू जेवण न करता आम्हाला सोडून का चाललास' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. शाम यांनी शिव्या का देतोस असे विचारताच तुषारने रागाच्या भरात काहीतरी लोखंडी वस्तूने शामच्या डाव्या डोळ्याच्या भुवयीवर मारून त्याला जखमी केले. इतर दोघांनीही अंगावर धावून जात दहशत माजवली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत तुषार राऊत आणि इतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.