गेवराई शहरातील आर. बी. अट्टल महाविद्यालयाजवळ काम आटोपून घरी परतणाऱ्या एका ५३ वर्षीय मजुरावर तीन अज्ञात तरुणांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीकांत निवृत्ती सुतार (रा. दारुल उलूम, गेवराई) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते घराकडे पायी जात असताना, तिथे बसलेल्या अंदाजे २४ वर्षे वयाच्या तीन अनोळखी तरुणांनी त्यांच्यावर चाकूसारख्या तीक्ष्ण शस्त्राने अचानक हल्ला केला. याप्रकरणी श्रीकांत सुतार यांच्या तक्रारीवरून २७ ऑक्टोबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
गेवराईत मजुरावर चाकूने हल्ला; तीन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!