गेवराई: पूर्वीच्या प्रकरणात साक्षीदार का झालास, या कारणावरून एका तरुणाला हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना जालना रोडवर घडली आहे. आकाश साहेबराव जाधव (वय ३१, रा. गेवराई) हे चौदा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करत होते.
यावेळी शुभम हरिश्चंद्र गाबुद्ध याने तिथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने आकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जेवणाचे ताट थेट डोक्यात मारले आणि गंभीर जखमी केले. तसेच, यापुढे साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंधरा ऑक्टोबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यात मारहाण आणि धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!