गेवराई तालुक्यातील गोपत पिंपळगाव येथे जुन्या वादातून एका तरुणावर चौघांनी कुऱ्हाड, लाकडी दांडे आणि दगडांनी सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला असून, तलवाडा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील राजेटाकळी (ता. घनसावंगी) येथील दत्तात्रय आप्पासाहेब तौर (वय ५५) हे आपल्या सहकाऱ्यांसह चारचाकीने गोपत पिंपळगाव येथे गेले होते. तिथे पोहोचताच आरोपी प्रतीक तौर, श्रीराज तौर, श्रीकांत तौर, नितीन तौर आणि इतर तिघांनी त्यांना घेरले. जुन्या वादातून आरोपींनी कुऱ्हाडीच्या दांड्याने दत्तात्रय यांच्या डोक्यावर जोरदार वार करून त्यांना रक्तबंबाळ केले, तसेच एका महिलेने त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. दत्तात्रय तौर यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!