गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील एका नागरिकाची एक लाख रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी आणि विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात भामट्याने हॉटेलबाहेरून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ११ ऑक्टोबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास भंडगवाडी शिवारातील हॉटेल निशांतसमोर ही चोरी झाली.
नारायण गणपतराव मराठे (वय ५३, रा. पाडळशिंगी) हे जेवण करण्यासाठी हॉटेल निशांतमध्ये गेले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (MH 23 BQ 3911) हॉटेलबाहेर उभी केली होती. गाडीच्या पॉकेटमध्ये विवो वाय ५१ प्रो हा २० हजार रुपयांचा मोबाईलही ठेवलेला होता. जेवण करून बाहेर आल्यानंतर त्यांना गाडी आणि मोबाईल दोन्ही गायब असल्याचे दिसले. आजूबाजूला शोध घेऊनही गाडीचा पत्ता न लागल्याने त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गुजर या प्रकरणाचा तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!