गेवराई बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका ६५ वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या जयश्री संतोष जाधव (३०, रा. बीड) या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमन पाचपुते या गुळजला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तातडीने तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिलेला अटक केली. तिच्याकडून चोरीला गेलेला तब्बल ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.