बीड : बळीराजाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड व्हावी आणि त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी येडेश्वरी साखर कारखान्याने नेहमीप्रमाणे यंदाही शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे चेअरमन तथा खा.बजरंग सोनवणे यांनी दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन ५१ रुपये वर्ग केले आहेत. यामुळे यंदा एफआरपीपेक्षा तब्बल ४१८.५६ रुपये अधिक म्हणजेच प्रति टन २,८५१ रुपयांचा विक्रमी दर देऊन 'येडेश्वरी साखर कारखाना' संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल (क्रमांक १) ठरला आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ साठी शासनाने येडेश्वरी साखर कारखाना युनिट १ साठी प्रति टन २४३२.४४ रुपये एफआरपी निश्चित केली होती. मात्र, बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कारखान्याने आजवर २८०० रुपये प्रति टन आधीच एकरकम अदा केले होते. आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ५१ रुपये प्रति टन जमा करण्यात आले असून, यामुळे आतापर्यंतचा एकूण दर २,८५१ रुपये प्रति टन इतका झाला आहे. शासनाच्या एफआरपीपेक्षा प्रति टन तब्बल ४१८.५६ रुपये इतका अधिक भाव देणारा हा कारखाना ठरला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची आपली उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राखत, गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये प्रति टन २,८५१ रुपये देऊन येडेश्वरी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचा मान पटकावला आहे. कारखान्याच्या या विक्रमी दरामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये प्रचंड आनंद असून, चेअरमन खा.बजरंग सोनवणे यांच्या या निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे.
शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलातील काही रक्कम जमा करण्याचा संकल्प मी गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच केला होता. त्याअनुषंगाने ५१ रुपये प्रति टन प्रमाणे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे हित आणि समृद्धी हेच आमचे अंतिम ध्येय आहे.
खा.बजरंग सोनवणे, चेअरमन, येडेश्वरी साखर कारखाना.
खा.सोनवणेंच्या ' येडेश्वरी' कारखान्याने शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड
प्रति टन ५१ रूपये केले खात्यावर वर्ग, एफआरपीपेक्षाही दिला अधिक दर
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!