बीड - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ४,५४९ पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, बँक शाखा व विकास संस्थांमध्ये उपलब्ध आहे.

या योजनेत २ लाखांवरील थकबाकीचा स्वतःचा हिस्सा शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत भरणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेमार्फत पोर्टलवर माहिती अद्ययावत झाल्यावर शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करता येईल आणि शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ खात्यात जमा होईल.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील प्रलंबित २५,३५० शेतकऱ्यांसह समझोता योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी केले आहे.