चौसाळा, दि. १९ (प्रतिनिधी) : सध्या बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे हिंगणी खुर्द येथील तरुण नवनाथ तांदळे यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांना मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा शुभारंभ बीड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या शुभहस्ते दिनांक १८ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी श्रीफळ फोडून करण्यात आला. मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असलेले टँकर भरण्यासाठी किंवा गावकरी म्हणतील त्याप्रमाणे पत्रकार अमोल तांदळे यांनी गावालगत असलेल्या शेतातील बोरवेलचे ऊसाचे पाणी बंद करून दोन तास मोफत पाणी देणार असल्याचे सांगितले.

यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके असं म्हणाले की, हिंगणी खुर्द येथील नवनाथ तांदळे या युवकाने गावकऱ्यांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे टँकर भरण्यासाठी ज्यांच्या बोअरवेलला पाणी आहे त्यांनी त्यांना मोफत पाणी द्यावे. तसेच हिंगणी खुर्द येथील तरुणांप्रमाणे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक भावनेतून पुढाकार घ्यावा असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले. तसेच या दुष्काळी परिस्थितीला हिंगणी खुर्द प्रमाणे सामाजिक भावनेने तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनी, तरुणांनी पुढाकार घेऊन दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे. यासाठी तहसीलदार म्हणून प्रशासन पूर्णपणे सर्वांच्या सोबत असेल.

यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा गावकऱ्यांच्या वतीने नवनाथ तांदळे यांनी सत्कार केला. तसेच मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल नवनाथ तांदळे यांचा सत्कार तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी करून अभिनंदन केले. यावेळी हिंगणी खुर्द येथील पत्रकार अमोल तांदळे, माजी सरपंच रमेश तांदळे, वासुदेव आंधळे, भागवत आंधळे, ग्रामपंचायत सदस्य परसराम तांदळे, गणेश आंधळे, मधुकर तांदळे, पोलीस पाटील अशोक नागरगोजे, यांच्या गावकरी, रावसाहेब तांदळे, राम तांदळे, वामन तांदळे, प्रकाश मुंढे, विजय आंधळे, सूरज बांगर, वामन मुंढे, पिंटू आंधळे, रामदास तांदळे, आबा तांदळे, विठ्ठल तांदळे, प्रदीप आंधळे, अजय बांगर, श्रीकृष्ण तांदळे, रामहरी आंधळे, विकास तांदळे, रवींद्र मुंढे, बाळू आंधळे, भानुदास खेडकर, अनिकेत खेडकर, घनश्याम तांदळे, धनराज तांदळे, चंद्रशेन तांदळे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगणे खुर्द येथील तरुणांप्रमाणे तालुक्यातील इतर तरुणांनी नागरिकांनी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सामाजिक भावनेतून पुढाकार घ्यावा. तसेच मंडळाधिकारी त्याला त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जाऊन सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे येणाऱ्यांशी चर्चा करून प्रोत्साहन द्यावे त्यासाठी प्रशासन सर्वांच्या पाठीशी आहे.

चंद्रकांत शेळके (तहसीलदार, बीड)

माझ्या गावातील माता माऊल्यांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्यासाठी मी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यासारख्या अनेकांनी पुढे येऊन शक्य होईल ती मदत करावी. तसेच ज्यांच्या बोरवेलला, विहिरीला पाणी आहे त्यांनी किमान एक टँकर भरण्यासाठी पाणी मोफत द्यावे ही विनंती.

- नवनाथ तांदळे, (युवक, हिंगणी खुर्द)

माझे गावालगत शेत आहे सध्या मी माझ्या तोडणीला आलेल्या ऊसाचे पाणी बंद करून नवनाथ तांदळे गावकऱ्यांना मोफत पाणीपुरवठा करत असलेले टँकर भरण्यासाठी दोन तास मोफत पाणी देत आहे. तसेच ऊस तोडणी झाल्यानंतर गावासाठी किमान चार तास कायमस्वरूपी मोफत पाणी देणार आहे.

-अमोल तांदळे (स्थानिक पत्रकार)