धारूर आगारातून रात्री ९ वाजता सुटणारी धारूर-पुणे बस सेवा प्रशासनाने अचानक बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही गैरसोय थांबवण्यासाठी बस सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांनी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याशिवाय, संध्याकाळी ७:१५ ची धारूर-मुंबई बस चौसाळामार्गे न सोडता, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ती केजमार्गे सोडावी, असेही सुचवण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निवेदनावर एस. डी. ठोंबरे, एस. एम. पठाण, ए. एम. आंधळे, एन. बी. खोटे यांच्यासह अनेक त्रस्त प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने याची त्वरित दखल घेणे अपेक्षित आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!