पुणे: कुटुंबव्यवस्था, आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन, पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे, आणि मूल्यशिक्षण या क्षेत्रांत भारतीय जैन संघटना आणि शांतिलाल मुथा फाउंडेशनतर्फे गेल्या ४१ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी त्यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्यालयाला भेट देऊन घेतली.
तसेच या प्रकल्पांच्या विस्तारासाठी लवकरच शांतीलाल मुथा यांना दिल्लीत बोलावून चर्चा करू.असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शांतिलाल मुथ्था यांनी दिली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच भारतीय जैन संघटनेचे सल्लागार अभय फिरोदीया, शांतिलाल मुध्या फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर
सांकला, विश्वस्त वल्लभ भन्साळी, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन उपस्थित होते. शांतिलाल मुथ्या यांनी दोन्ही संस्थांच्या गेल्या ४१ वर्षांतील वाटचालीची, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, मूल्यवर्धन कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली. शांतीलाल मुथा हे अंबाजोगाई येथील कुंकुलोळ परिवाराचे जावाई आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!