बीड - घराच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने पत्र्याला हात लागून एका 70 वर्षीय वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अन्य तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना आज सकाळी कपिलधारवाडी येथे घडली. नवनाथ दगडु शिंदे (रा. कपिलधारवाडी, वय 70 वर्षे) यांच्या घरासमोर स्वयंपाकासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. या शेडमध्ये आज सकाळी विजप्रवाह उतरला. पत्र्याला हात लावल्याने त्यांच्या मुलाला शॉक बसला असता हा प्रकार नवनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी धावत येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा शॉक लागून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर घरातील अन्य तिन

जणांनाही शॉक लगावला. सुदैवाने हे तिघे बचावले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मयत नवनाथ शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात

आला होता.