अंबाजोगाई: तालुक्यातील पट्टीवडगाव येथे एका शेतकऱ्याने सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या आगीत १५ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख पाच हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तानाजी एकनाथराव वाकडे (वय ५५, राहणार पट्टीवडगाव, तालुका अंबाजोगाई) असे नुकसान झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. तानाजी वाकडे यांची पट्टीवडगाव शिवारातील गट क्रमांक ५४२ मध्ये शेती असून, त्यांनी पिकाची सोंगणी करून सोयाबीनचा ढीग शेतातच लावून ठेवला होता. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने अचानक आग लावली. शेजाऱ्यांनी रात्री उशिरा आग लागल्याची माहिती दिल्यानंतर तानाजी यांनी शेताकडे धाव घेतली. त्यांनी व शेजाऱ्यांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सोयाबीन पूर्णपणे जळून खाक झाले होते. एका अज्ञात समाजकंटकाच्या या कृत्यामुळे हाता-तोंडाला आलेला घास हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तानाजी वाकडे यांच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जाणीवपूर्वक नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय भीमराव खरात हे करीत आहेत.
अज्ञात समाजकंटकाने पेटवला सोयाबीनचा ढीग; शेतकऱ्याचे लाखभराचे नुकसान
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!