बीड तालुक्यातील कान्होबा तांडा येथे उसतोड मुकादमाच्या चुलत्याशी वाद घालून अडीच लाख रुपये किमतीचा ट्रक बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कान्होबा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर राहुल यादव चव्हाण (वय २५) यांचा लाल-पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक (MH-13 R-2174) उभा होता. यावेळी आरोपी विष्णू पवार, अशोक पवार, भिमा पवार आणि सुभाष राठोड (सर्व रा. ढेकणमोहा तांडा) यांनी राहुल यांचे चुलते भिमा चव्हाण यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी उभा असलेला ट्रक जबरदस्तीने पळवून नेला. याप्रकरणी राहुल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ४ नोव्हेंबर रोजी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आघाव करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!