परळी: तालुक्यातील जिरेवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातून ११ हजार रुपये किमतीची ३ एचपी क्षमतेची पाण्याची मोटार आणि ४० फूट तांब्याची वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन हंगामात ही चोरी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गोविंद महादेव मुंडे (वय ५५) यांच्या गट क्रमांक ९१ मधील शेतात १ ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी शेतातील जयश्री कंपनीची ३ एचपी मोटार (किंमत १०,००० रुपये) आणि स्टार्टरपासून मोटारीपर्यंत जोडलेली ४० फूट लांबीची कॉपर वायर (किंमत १,००० रुपये) असा एकूण ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी वायरचे नुकसानही केले आहे. गोविंद मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!