बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ असलेल्या रामदेव राजस्थानी रायका हॉटेलसमोर एका तरुणाला अडवून मारहाण करत त्याच्या खिशातील रोख रक्कम लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

वडगाव गुंदा येथील व्यापारी वैभव बाबासाहेब गव्हाणे (वय २५) हे हॉटेलसमोर असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अचानक घेरले. आरोपींनी वैभव यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ९ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. लुटालूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.