केज  - पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १२ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

     केज शहरातील हौसिंग कॉलनी भागातील विक्रम राजाभाऊ लांडगे यांच्या फिर्यादीनुसार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देशमुख पेट्रोल पंपावर कारमध्ये सीएनजी भरण्यास गेले असता अनोळखी व्यक्तीने त्यांना कार मागे घेण्यास सांगितले. त्याने तू कार माझ्या पुढे का घेत आहेस असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर सीएनजी भरून आल्यावर ऋषीकेश बोबडे याने कारचा काच फोडून बाहेर बोलावले. त्या अनोळखी बोलावलेले त्याचे मिञ अर्जुन साठे, ऋषीकेश कराड, अनंत डोईफोडे, अजय महाडिक, महादेव मोरे, निलेश चौरे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यास संपवुन टाका नाही, तर मी याचे हातपाय तोडतो, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यांचा भाऊ  यास ऋषीकेष बोबडे याने लोखंडी पाईपने हातावर मारून दुखापत केली. या झटापटीत त्यांची सोन्यांची अंगठी ही हरवली आहे. अशी तक्रार विक्रम लांडगे यांनी दिल्यावरून वरील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

    दुसऱ्या गटाचे ऋषिकेश बोबडे यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ अनिकेत याने भांडण झाल्याचे सांगून त्यांना बोलावून घेतले. पेट्रोल पंपावर रांगेत उभे असलेल्या साहील बाबा पुर्ण नाव माहीत नाही, विकी लांडगे, बालु रांजनकर व एक अनोळखी या चौघांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर या चौघांनी कारमधून पेट्रोल पंपाच्या गेटवर येऊन अनिकेत यास शिवीगाळ करीत लाथाने व चापटाबुक्याने मारहान करण्यास सुरुवात केली. याच वेळी एकाने बेस बॉलची स्टिक त्यांच्या पाठीमागून डोक्यात मारून दुखापत केली. त्यांनी दोघा भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार ऋषिकेश बोबडे याने दिल्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख हे पुढील तपास करीत आहेत.