खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी व 'एआय' (AI) तंत्रज्ञानाने बनवलेली असल्याचा खळबळजनक पलटवार सुग्रीव कराड यांनी केला आहे. केज नगरपंचायतीत माझ्या पत्नीने खासदारांच्या मुलीचा पराभव केल्याने, केवळ राजकीय आकसापोटी मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे कराड यांनी स्पष्ट केले.

बीड कारागृहातून खासदारांच्या मुलाला गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप सोनवणे यांनी केला होता. या गंभीर आरोपानंतर पोलीस प्रशासनाने बीड जिल्हा कारागृहाची सलग सात तास कसून झाडाझडती घेतली. जुन्या टोलनाका वादावरही कोर्टात तडजोड झाल्याचे कराड यांनी सांगितले असून, आता फॉरेन्सिक तपासातूनच या ऑडिओ क्लिपचे सत्य समोर येणार आहे.