आष्टी तालुक्यातील हनुमंत गाव येथे कौटुंबिक वादातून एका ३९ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचा दात पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सुभाष दशरथ मदने (वय ३९) हे आरोपींच्या घरासमोर असताना बद्रीनाथ मदने, प्रल्हाद मदने, सोमनाथ मदने आणि रामा मदने या चौघांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी सुभाष यांच्या तोंडावर आणि हातावर जोरात मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा दात पडला आणि फ्रॅक्चरही झाले. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ८ ऑक्टोबर रोजी सुभाष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!