आष्टी तालुक्यातील वेलतुरी येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ३९ वर्षीय शेतकऱ्याला काठी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी संपत किसन गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी असून जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात बटी आबासाहेब गव्हाणे, आबासाहेब नरहारी गव्हाणे, दादासाहेब नरहारी गव्हाणे (सर्व रा. वेलतुरी) आणि भागीनाथ पोपट म्हस्के (रा. सावरगाव) या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून संपत गव्हाणे यांच्या डोक्यात दगड व लाकडी काठीने वार केले, तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.