आष्टी तालुक्यातील एका गावात जुन्या वादाची कुरापत काढून ५५ वर्षीय शेतकऱ्याला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता घडली.
गोविंद रघुनाथ करडुळे (वय ५५) हे गावातील मंदिराच्या पारावर बसले असताना, महेश अशोक करडुळे (रा. आष्टी) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याशी वाद घातला. संतापाच्या भरात महेशने गोविंद यांना काठीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोविंद करडुळे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी महेश करडुळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार नवले तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!