महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट ५ हजार रुपये वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली.
दुष्काळ जाहीर झाला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे; मात्र संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या थेट आर्थिक मदतीमुळे राज्य सरकारवर ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!