केज:- केज तालुक्यातील कापरेवाडी येथून ४५ वर्षीय विवाहित महिला ही तिचे पती रात्री शेतात गेल्या नंतर बेपत्ता झाली आहे.

केज तालुक्यातील कापरेवाडी येथील गणेश सुंदरराव कापरे ही दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या शेतातील गोठ्यावर झोपण्यासाठी गेले होते. तर त्यांची पत्नी घरी होती. 

दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी घरी येऊन पहिल्या नंतर त्यांना, त्यांची पत्नी सुरेखा ही घरी नसल्याचे निदर्शनास आले. या बाबत त्यांनी त्यांच्या बँकेत नोकरी करीत असलेल्या मुलीकडे चौकशी केली असता, तिने याची कल्पना नसल्याचे सांगितले. 

त्या नंतर गणेश कापरे यांनी पिंपरी, बोरगाव येथील मंदिरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्याची पत्नी आढळून आली नाही. 

त्यांच्या पत्नीचे वय सुमारे ४५ वर्ष, उंची पाच फुट, अंगात पिवळसर रंगाची साडी व पिवळसर ब्लाउज, गळ्यात सोन्याचे मनी मंगळसुत्र, पायात चप्पल, केस काळे-पांढरे, हातात बांगड्या असून, तिला मराठी भाषा बोलता येते व समजते.

गणेश कापरे यांच्या तक्रारी वरून त्यांची पत्नी बेपत्ता असल्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ७३४/२०२६, भा. न्या. सं. १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड महावीर सोनवणे तपास करीत आहेत.