अंकुशनगर : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीचे सहा अधिकारी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता अंकुशनगर येथील जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या संभाषणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
या तपासात ऑडिओ क्लिपचे मूळ रेकॉर्डिंग आणि संबंधित पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्याकडील ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावे ताब्यात घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा सुरू केली आहे. या पुराव्यांच्या आधारे रेकॉर्डिंगमधील आवाज, संभाषण कधी व कुठे झाले, मूळ स्रोत आणि तांत्रिक सत्यता यांची पडताळणी एसआयटीकडून केली जाणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!