माजलगाव - मोटरसायकल चालवत असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास छोटेवाडीहून रामनगर तांड्याजवळ घडली.

संगुराम साहेबराव माने (वय 40) आणि धर्मराज बालासाहेब सोमासे (रा. सुरूमगाव) हे दोघे मोटरसायकलवरून छोटेवाडीहून निघाले होते. रामनगर तांड्याजवळ मोटरसायकल चालवत असताना संगुराम माने यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात संगुराम माने यांचा जागीच मृत्यू झाला, तर धर्मराज सोमासे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.