बीड जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने भीषण जलसंकट ओढवले असून, जिल्ह्यातील १६४ पैकी तब्बल ११८ प्रकल्प पूर्णपणे तळाला गेले आहेत. सध्या जिल्ह्यात केवळ १४.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो जेमतेम दीड महिनाच पुरेल अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेवराई तालुक्यात शून्य टक्के पाणीसाठा उरला असून शिरूर, केज, पाटोदा आणि अंबाजोगाईची स्थितीही अत्यंत विदारक आहे. उपलब्ध साठ्यापैकी ९५ टक्के पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार असल्याने आगामी काळात जनतेला पाण्यासाठी तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!