आष्टी तालुक्यातील मिरजगाव रोडवरील राजमुद्रा किराणा दुकानासमोर जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धिर्डी शिवारात घडला असून यात महेश अशोक करडुळे हे जखमी झाले आहेत.
धिर्डी येथील अजय गोविंद करडुळे, वैभव गोविंद करडुळे, ऋषिकेश दादासाहेब करडुळे आणि गोविंद रघुनाथ करडुळे या चौघांनी संगनमत करून महेश करडुळे यांना अडवले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी महेश यांना मारहाण करत शिवीगाळ केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीनंतर महेश करडुळे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!