केज :- केज तालुक्यातील देवगाव येथे टाटा पॉवर हाऊसच्या कामात अडथळा निर्माण करून काम अडविणाऱ्या तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील देवगाव येथे गट नं. ८५-अ मध्ये टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी या कंपनीचे पॉवर हाऊसचे काम सुरू आहे.

दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास प्रकल्प विकास अधिकारी विवेक शहाजी गायकवाड, प्रभारी अधिकारी जनार्धन लालासाहेब घाडगे, अभियंता जितेंद्र यादव, ऋषीकेश नानासाहेब वाबळे आणि सहाय्यक अभियंता धम्मपाल यशवंत सावळे, सोयेब वाहेब अहेमद यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली त्या ठिकाणी एमसीआर बसवण्यासाठी फाउन्डेंशन काँक्रिटचे काम सुरू असतांना; गोरख जगन्नाथ मुरकुटे, सुनिल रंगनाथ मुरकुटे, आशोक रंगनाथ मुरकुटे सर्व रा. देवगाव ता. केज जि. बीड हे आले. त्यांनी अधिकारी, अभियंते आणि कामगार यांना तुम्ही काम बंद करा. असे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक काम अडवून बंद केले.

प्रकल्प विकास अधिकारी विवेक गायकवाड यांच्या तक्रारी वरून गोरख जगन्नाथ मुरकुटे, सुनिल रंगनाथ मुरकुटे आणि आशोक रंगनाथ मुरकुटे या तिघा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६९४/२०२६ भा. न्या. सं. १२६(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गोविंद मुंडे हे तपास करीत आहेत.