केज :- गोवंशीय प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक करणारे पिक-अप केज पोलिसांनी पकडून त्यांची सुटका केली आहे. या कारवाईत साडे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 दिनांक २९ ऑक्टोबर, गुरुवार रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास एक पिकअप हे तीन बैल, एक गाय आणि दोन कालवड असे सहा गोवंशीय प्राणी भरून अंबाजोगाई रस्त्याने जात असल्याच्या माहिती वरून केज पोलिसांनी सापळा लावून केज-अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालया समोर पकडले. पोलिसांनी पिक-अपची (एम एच-५५/सी-०२३२) झडती घेतली असता पिकअपमध्ये हे गोवंशीय गुरे हे बेकायदेशिररित्या स्वताःच्या आर्थिक फायद्यासाठी क्रूर व निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ७० हजार रुपयांचा बैल, ५५ हजार रुपयांची जर्सी गाय, ६० हजार रुपयांची संकरित गाय, ७० हजार रुपयांचा जर्सी बैल, ४५ हजार रुपयांची दोन जर्सी कारवड व ३ लाख ५० हजार रु. चे पीक-अप असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अंमलदार प्रकाश मुंडे यांच्या फिर्यादी वरून गुरांचा मालक सलमान महेबुब शेख (रा. वाढवणा ता. उदगीर जि. लातुर) व पिकअप चालक रमेश बापुराव चव्हाण (रा. डोंगर कोन्हाळी ता. जळकोट जि. लातुर) या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ६८४/२०२६, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), १२(१)(इ), महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम, ११९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस हेडकॉस्टेबल संगीता हनवते या पुढील तपास करीत आहेत.