केज:- केज तालुक्यातही साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारातून एका ५५ वर्षीय इसमाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केले आहे.

दि. २९ ऑक्टोबर, गुरुवार रोजी टाकळी ता. केज येथील रामहरी कारभारी घुले, वय (५५ वर्ष) हे केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात आले होते. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांची पत्नी सौ. मंगल घुले यांना त्यांनी फोन करून ते घरी येत असल्याचे सांगितले, मात्र ते घरी आले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. 

रामहरी घुले यांचे वय ५५ वर्षे, रंग-सावळा, उंची ५ फुट, अंगात पांढरा कुडता, पांढरी पँट आहे.

रमेश घुले यांच्या तक्रारी वरून रामहरी घुले यांचे अज्ञात इसमांनी फूस लावून अपहरण केल्याच्या तक्रारी वरून अज्ञात इसमा विरुद्ध गु. र. नं.  ६८७/२०२६ भा. न्या. सं. १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गोरख फड हे तपास करीत आहेत.