शिरूर कासार तालुक्यातील पाँडुळ क्रमांक ३ येथे शेतीच्या हिशोबाच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाला दगड फेकून मारत रक्तबंबाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही मारहाण ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात बंडू बाबुराव सानप हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत बाबुराव सानप याने शेताचा हिशोब बरोबर का केला नाही असा जाब विचारत बंडू सानप यांच्याशी वाद सुरू केला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर आरोपीने शेजारी पडलेला दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यात आणि कपाळावर मारला. हिशोब नीट केला नाही तर जिवेच ठार मारीन, अशी धमकीही त्याने दिली. जखमी बंडू सानप यांनी उपचार घेऊन शिरूर कासार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी हनुमंत सानपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!