परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात शेतात भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर चौघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बबिता गोविंद मुंडे (४५, व्यवसाय शेती, रा. जिरेवाडी, ता. परळी) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अश्विनी त्र्यंबक मुंडे, विवेक अंकुश मुंडे, सुदामती अंकुश मुंडे आणि इंदुमती अर्जुन मुंडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीने घटनेची माहिती घेतल्यानंतर दोघे आरोपींच्या नातेवाइकांकडे विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खाली पडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!