केज:- गर्दीचा गैरफायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रु. किमतीचे  सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाले आहे.

दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दुपारी धाराशिव जिल्ह्यातील जवळा ता. कळंब येथील सोजरबाई विठ्ठल कांबळे वय (६० वर्षे) ही वृद्ध महिला अंबाजोगाई येथील दवाखान्यातून केज येथील बस स्टँडवर आल्या होत्या. त्या नंतर अंदाजे दुपारी ४:३० वा. सुमारास कळंबकडे जाणाऱ्या बस लागल्याने त्या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पाठी मागुन अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रु. किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र झटका देवुन तोडले; तेव्हा त्या महिलेने त्या चोरट्याचा हात पकडन्याचा प्रयत्न केला असता तो त्या महिलेच्या हाताला झटका देऊन पळून गेला. महिलेने आरडा ओरड केल्या नंतर बस स्थानकातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला  परंतु तो चोरटा गर्दीचा गैरफायदा घेऊन पसार झाला.

सोजरबाई कांबळे या महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७०२/२०२६ भा. न्या. सं. ३०४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास स्थानिक डी बी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहेत.