केज : केज शहरातील मंगळवार पेठेतील कुरिअर व्यवसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
केज शहरातील मंगळवार पेठ भागातील कुरिअर व्यवसायिक आनंद गोपालदास काकाणी, वय (३७ वर्ष) यांनी राहत्या घरातील छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले. महिला हेडकॉन्स्टेबल कविता गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
दरम्यान आनंद काकाणी यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट समजू शकलेले नाही.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!