पाटोदा : शासकीय रस्त्यावर जेसीबीने खड्डे खोदून कंपनीची वाहने अडवत प्रत्येकी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार पाटोदा तालुक्यातील सोने सावरगाव शिवारात घडला आहे. पैसे न दिल्यास वाहने जाऊ देणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळही करण्यात आली. ही घटना ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान दासखेड फाटा ते थेरला फाटा दरम्यानच्या पालखी मार्गावर घडली. 'सन पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रा. लि.' या कंपनीचे काम सुरू असताना महेंद्र नागरगोजे, नारायण नागरगोजे, अशोक नागरगोजे, किशोर राख आणि शामसुंदर नागरगोजे या पाच जणांनी संगनमत करून कंपनीची वाहने अडवली. त्यांनी रस्त्यावर खड्डे खोदून नुकसान केले आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करत खंडणी मागितली. याप्रकरणी तुकाराम लटपटे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक भावड तपास करत आहेत.
शासकीय रस्त्यावर जेसीबीने खड्डे खोदून २० लाखांची खंडणी मागितली; पाटोदा शिवारात पाच जणांवर गुन्हा
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!