पाटोदा: पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे भरदिवसा एका बंद घराचे कुलूप उघडून कपाटातील तब्बल ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा घरफोडीचा प्रकार २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी घडला.
अशोक पांडुरंग सानप (वय ४२, रा. सौताडा, पाटोदा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अशोक सानप हे भुसार मालाचे अडत व्यापारी आहेत. मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी त्यांनी ३ लाख ८० हजार रुपये आणून घरातील कपाटात ठेवले होते. २४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून आणि चावी जवळच असलेल्या खिडकीत ठेवून ते बांधकामाच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गेले होते.
थोड्या वेळाने ते परत आले असता घराचे बाहेरील चॅनेल गेट व आतील दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाटाचे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि ५०० रुपये दराच्या ७६० नोटा असलेली रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई गोरक्षनाथ एकनाथ मिसाळ हे करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!