पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे चुलत्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याला जमावाने बेदम मारहाण करत त्याचे डोके फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही काठीने मारण्यात आले.

अतुल उबराव गर्जे हे घरासमोर उभे असताना कल्याण यादव गर्जे, दिनकर भास्कर गर्जे, अमोल कल्याण गर्जे, बाळू कल्याण गर्जे आणि सुनंदा कल्याण गर्जे यांनी तिथे येऊन वाद घातला. आरोपींनी अतुल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डोक्यात प्रहार करत गंभीर जखमी केले. या भांडणात साक्षीदाराच्या पत्नीने मध्यस्थी केली असता तिलाही काठीने मारहाण करण्यात आली. पाटोदा पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.