केज :- केज-कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळ सर्वज्ञ अकॅडमी जवळ ट्रॅक्टरने मोटार सायकलस्वाराला दिलेल्या धडकेत मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
दि.११ नोव्हेंबर रोजी धारूर जि. बीड येथील खय्युम शेख गयासुद्दीन शेख आणि त्यांच्या सोबत असलेले दोघे हे साळेगाव कडून धारूरकडे जात असताना सायंकाळी ७:०० च्या सुमारास केज-कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळ सर्वज्ञ अकॅडमी जवळ त्यांच्या मोटार सायकलीला पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रॅकरने जोराची धडक दिली. यात खय्युम शेख यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले रस्त्याच्या बाजूला उडून पडल्याने ते दोघे जखमी झाले आहेत. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह बेपत्ता झाला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी अपघातस्थळी पोलिस कर्मचारी पाठवून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!