बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील माळअप्पाच्या वाडीच्या घाटात एका ३३ वर्षीय तरुणाला गाडी आडवी लावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून बाप-लेकासह तिघांनी हा हल्ला केला.
वडझरी येथील रहिवासी देविदास भीमराव सानप हे हॉटेलमधून जेवण करून घरी परतत असताना हा प्रकार घडला. आरोपी सागर सानप याने आपली कार देविदास यांच्या गाडीसमोर आडवी लावली. त्यानंतर आरोपी कोंडीबा सानप व त्याचा मुलगा अजिंक्य सानप यांनी देविदास यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, अजिंक्यने जॅकच्या लोखंडी टॉमीने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी देविदास सानप यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!