बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण हद्दीतील शृंगारवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातून सौर ऊर्जेवर चालणारी पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चोरी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी या वेळेत झाली.

शृंगारवाडी येथील शेतकरी बालाजी श्रीपती यादव (४४) यांच्या गट नंबर २५३ मधील शेतातून ही चोरी झाली. चोरट्यांनी २२,५०० रुपये किमतीची ३ एचपी क्षमतेची सौर पाणबुडी मोटार, कंट्रोलर आणि २०० फूट वायर पळवून नेली. यादव यांच्या फिर्यादीवरून १२ नोव्हेंबर रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.