प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदा अर्जुन शिंदे यांचा विवाह २०११ मध्ये पांगरी येथील अर्जुन शिंदे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर चार वर्षे सुरळीत गेल्यानंतर, 'तू काळी आहेस, काम येत नाही' असे हिणवत सासरच्यांनी पैशांसाठी तगादा लावला. उपाशीपोटी ठेवून, मारहाण करत २०२२ च्या दिवाळीत चंदा व त्यांच्या मुलीला घरातून हाकलून दिले. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सासरच्यांनी उमापूर येथे येऊन चंदा यांच्या आई-वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून १२ नोव्हेंबर रोजी पती अर्जुन शिंदे, सासरे अंबादास, सासू लक्ष्मीबाई यांच्यासह इतर नातेवाईकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.